विद्यार्थी मित्रहो,

विद्यार्थी कल्याण विभाग, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती आणि शिवशक्ती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बाभूळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. 14 ते गुरूवार,17 मार्च 2022 ह्या कालावधीत महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात दु. 12.00 ते 3.00 वा. ह्या वेळेत (अनौपचारिक मृदू-कौशल्य विकास कार्यशाळा) सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट वर्कशॉप आयोजित करण्यात आलेला आहे. ह्यात महाविद्यालयातील पदवीच्या अंतिम वर्षात प्रवेशित विध्यार्थी/विद्यार्थिनीच सहभागी होऊ शकतात. चार दिवसात विद्यापीठाचे सॉफ्ट स्किल ट्रेनर ऍक्टिव्हिटी बेस दहा प्रेझेंटेशन/व्याख्यान देणार आहेत. सर्व सहभागीना भरपूर स्किल, थोडंसं ज्ञान, इवलस मनोरंजन, खूप सारा आत्मविश्वास आणि विद्यापीठाचे प्रमाणपत्र मिळणार आहे. तेव्हा तुम्ही तर सहभागी व्हाच सोबत आपल्या मित्र मैत्रिणींना सुद्धा आवर्जून सहभागी व्हायला सांगा, त्यांना फोन लावा.

संयोजक:
प्राचार्य डॉ. प्रतिभा काळमेघ
प्रा. डॉ. सुधिर त्रिकांडे
प्रा. सुनिल ईश्वर
डॉ. संजय शेणमारे, ग्रंथपाल